🚨 अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या,अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारामध्ये  एका तरुणाचा अज्ञात कारणाने दोन अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने निर्घृण हत्या केली असल्याची घटना  रविवारी उघडकीस आली आहे. 

सचिन अरविंद शिंदे ( 23, रा मोठे बाबा मळा सायखिंडी, तालुका संगमनेर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील रहिवासी असलेल्या सचिन शिंदे यास

अज्ञात इसमांनी त्याच्या राहत्या घरून बोलावून घेत मोटर सायकलवर बसवून सायखिंडी गावाच्या शिवारातील सोमनाथ पारधी यांच्या सर्व्ह नंबर 234 मधील शेतामध्ये नेलं.

त्या अज्ञात दोन इसमांनी सचिन शिंदे याच्या मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने जबर वार करत त्याची रविवारी निर्घृण हत्या केली असल्याचे उघड झाले,

ही माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत त्या झालेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.

याबाबत  सचिन शिंदे यांचे वडील अरविंद शिंदे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात दोघांच्या विरोधात विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी दोन ते ४ जणांना ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी करण्याचे काम पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24