अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला आहे.
या निवडणकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांना 52 मते मिळाली आहेत. अमोल येवले यांना 10 मते मिळाली. पाच मते बाद झाली. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना 48 मते मिळाली तर शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांना 15 मते मिळाली. 4 मते बाद झाली आहेत.
अहमदनगर जिल्हा नियोजन समिती पोट निवडणुकीचा निकाल
सर्वसाधारण जागेसाठी १ जागा तर नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी १ जागा अश्या २ जागेचा निकाल खालील प्रमाणे
अनिल शिंदे ५२ मते (शिवसेना)
अमोल येवले १० मते (शिवसेना)
बाद मतदान ५
नागरीकांचा मागास (OBC) प्रवर्ग
जागा १ उमेदवार २
पडलेली मते
विनित पाऊलबुधे ४८ मते (राष्ट्रवादी)
सुवर्णा जाधव १५ मते (शिवसेना)
बाद मतदान ४
३ जागेपैकी १ जागेवर भाजपाच्या आशा कराळे बिनविरोध निवडुन आल्या होत्या त्यामुळे उर्वरीत २ जागेसाठी मतदान झाले त्यात सर्वसाधारण जागेवर शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांनी शिवसेनेच्याच अमोल येवले यांचा पराभव करुन विजयी झाले तर नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) या जागेवर राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे हे शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव करुन विजयी झाले आहेत.
महापालिकेमध्ये शिवसेनेचे 24 नगरसेवक असून त्यातील सारिका भुतकर यांचे पद रद्द झाल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे 23 ते होती. परंतु, निकालातून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना मत दिले नसल्याचे समोर आले आहे.