अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर एका उसाने भरलेल्या ट्रकने पुण्याच्या दिशेने जात असताना एका पायी चालणाऱ्या अज्ञात इसमाला रस्ता ओलांडत असताना जबर धडक दिली,
या अपघातात उस वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात इसम संबंधित ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला, ही घटना 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, अपघातात जखमी इसमाला तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ट्रक चालक मात्र ट्रक जागेवरच सोडून फरार झाला आहे,
तर अपघात होताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान या अपघातामुळे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.
Web Title – ahmednagar-breaking-one-dies-in-truck-accident