अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदाराच्या नावे शेतकऱ्यांकडून वसुली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्यांकडून किलोमागे एक रूपया अधिक घेतला जात आहे.

त्याचे कारण विचारले असता आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया अधिक घेण्यास सांगितले आहे, असे सांगण्यात आले, अशी तक्रार मार्केटिंग फेडरेशनकडे कर्जत तालुक्यातील शेतकरी महेंद्र धांडे यांनी केली आहे.

या प्रकाराची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय आधारभूत मका खरेदी केंद्र मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू आहे.

हे केंद्र कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवत आहे. या केंद्रावर १ हजार ७६० रूपये या शासकीय हमीभावानेशेतकऱ्यांच्या मकाची खरेदी केली जाते आहे. रविवारी (दि.२१) कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील शेतकरी महेंद्र धांडे हे त्या केंद्रावर मका घेऊन गेले होते.

यावेळी येथील केंद्रचालक पप्पू नेटके हे मकाचे किलो मागे एक रूपयाप्रमाणे पैसे द्यावेत, तरच तुमचा माल घेईल, असे सांगितल्याचे धांडे यांचे म्हणणे आहे.

पैसे कशासाठी घेता असे विचारताच त्याने आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया किलोमागे घ्या असे सांगितल्याचे म्हटले. त्यामुळे ही बाब रोहित पवार यांच्या लक्षात आणून दिली, असे धांडे यांनी सांगितले.

त्यांनी याबाबत मार्केटिंग फेडरेशनकडेही तक्रार केली आहे. येथे होणारी शेतकºयांची लूट थांबवावी, अन्यथा कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा धांडे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24