अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार तसेच भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जाहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.
राहीबाई पोपेरे (कृषी कार्य)
जुन्या वाणांची जपणूक करणारी बीजमाता म्हणून राहीबाई पोपेरे ओळखल्या जातात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेला पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या राहीबाई पोपरे यांना बीजमाता नावाने संबोधले जाते.
पोपटराव पवार (जलसंधारण)
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.खरीप व रब्बी पिकांसाठी तसेच ग्रामस्थांच्या पिण्यासाठीची वार्षिक गरज तसेच पाळीव जनावरांना पिण्यासाठीची गरज लक्षात घेऊन पावसाळ्यात गावात पडलेल्या पाण्याचे नियोजन पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
झहीर खानला (क्रीडा)
मूळचे श्रीरामपूरचे भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज म्हणून आपली कामगिरी बजाविणारे क्रिकेटपटू झहीर खान यांना देखील पद्श्रमी पुरस्कार जाहीर झाला आहे.भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात दबदबा निर्माण केलेल्या श्रीरामपूर एक्स्प्रेस अर्थात झहीरलाही हा सन्मान मिळाल्याची माहिती उशिरा समजली. ही माहिती येताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याच बरोबर जगदीप लाला आहुजा (सामाजिक कार्य), मोहम्मह शरीफ (सामाजिक कार्य), जावेद अहमद टाक (दिव्यांगासाठी कार्य), तुलसी गौडा (पर्यावरण), सत्यनारायण मुंदायूर (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य), उषा चौमूर (सामाजिक कार्य), हरेकला हजब्बा (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अरुणोदय मंडल (आरोग्य क्षेत्र), राधामोहन आणि साबरमती (कृषी क्षेत्रातील कार्य), कुशल कोनवार सरमा (प्राण्यांसाठी कार्य), त्रिनीटी साईओ (कृषी क्षेत्रातील कार्य), रवी कन्नन (आरोग्य), एस रामकृष्णन (दिव्यांगांसाठी कार्य), सुंदरम वर्मा (पर्यावरण), मुन्ना मास्टर (कला), योगी अॅरोन (आरोग्य क्षेत्रातील कार्य), हिंमत राम भांभू (पर्यावरण कार्य), मुजीक्कल पंकजाक्षी (कला क्षेत्र)