अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेनंतर जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
जिल्ह्यातील नगर,नेवासे,शेवगाव आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे निकाल पुढील प्रमाणे –
पंचायत समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले. सभापतीपदी कांताबाई कोकाटे, तर उपसभापतीपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे स्वाती कार्ले व बेबी पानसरे यांनी माघार घेतली.
पंचायत समितीच्या सभापतीपदी रावसाहेब कांगुणे, तर उपसभापतीपदी किशोर जोजार यांची बिनविरोध निवड झाली. क्रांतीकारी शेतकरी पक्षाने पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. नेवासे पंचायत समितीत १४ पैकी १२ जागांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व आहे.
पंचायत समितीच्या सभापतीपदा क्षीतिज घुले यांची, तर उपसभापतीपदी नुतन भोंगळे यांची निवड झाली आहे. घुले यांची फेरनिवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवगाव पंचायत समितीवर वर्चस्व कायम ठेवले आहे.
पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.