श्रीरामपुर :- कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली. या काळात नगराध्यक्ष, नगरसेवक यांना शहरात फिरण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे.
तसे आदेश पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. श्रीरामपुरातील काही नगरसेवक चार चाकी वाहनांवर अत्यावश्यक सेवा असा कागद लावून शहरात सारखे फिरत असतात.
त्यांच्या सोबत लोकही असतात. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहनांच्या फोटोसह तक्रारी करताच जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी सलिम शेख यांना संचारबंदी काळात पालिकेच्या पदाधिकारी यांनी घरातच रहावे,
घरी राहून कामकाज करावे, रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे. अशा सूचना दिल्या. त्यानुसार श्री. शेख यांनी नगरसेवकांना तोंडी कळविले असून सोमवारी सर्व नगरसेवकांना लेखी कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®