अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे.
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली .
महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित केले होते.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
त्यानंतरही भाजपाने अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी भाजपने ऐनवेळी खेडकर व आठवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केले होते,
सभागृहात संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष महाविकास आघाडीत असल्याने बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ त्यांच्याकडे होते.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
शालिनी विखे यांनी निवडणुकीत त्यांनी अर्ज दाखल केला नव्हता, तसेच त्या काँग्रेसमध्येच असल्याचे त्या सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने घुले व शेळके यांना उमेदवारी दिली होती.
भाजपकडून सुनीता खेडकर व उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला होता.भाजपने दोघांचे अर्ज दाखल केले होते, मात्र दोघांनीही अर्ज माघारी घेतले.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
त्यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राधाकृष्ण विखे यांनी घेतला. त्यामुळे घुले व शेळके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यातील बदलत्या समिकरणामुळे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे एकमत झाल्याने विरोधक भाजपच्या सदस्यांची संख्या जुळणार नाही. त्यामुळे ही निवडणूक जवळजवळ बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे.
हे पण वाचा : अमेरिकेत उच्च शिक्षण ते पहिल्याच टर्ममध्ये मंत्री… जाणून घ्या नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल ही माहिती
जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित झाले असून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सौ. राजश्री चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांचे पुतणे प्रताप शेळके पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
आज सकाळीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडण्यासाठी राष्ट्रवादी- कॉंग्रेस- शिवसेना महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या आघाडीतील ४२ सदस्यांची हजेरी होती.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
पदाधिकारी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, घनश्याम शेलार, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, आ. रोहित पवार, आ. आशुतोष काळे, प्रा. शशिकांत गाडे, क्रांतीकारीचे सुनील गडाख, ऍड. प्रताप ढाकणे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
महाविकास आघाडी आणि सोबत असलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आणि कालच शिवसेना कोट्यातुन कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले शंकरराव गडाख यांचे पाच सदस्य सोबत असल्याने बाळासाहेब थोरात यांचे पारडे मजबूत होते त्यामुळेच महाविकास आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता आली आहे.कॉंग्रेसचे सदस्य फुटण्याची शक्यता नाही. केवळ भाजपच्या सदस्यांचे संख्याबळ पुरेसे नाही. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही. साहजिकच भाजप या निवडणुकीतून अलिप्तच राहिल्यात जमा आहे.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …