अहमदनगर ब्रेकिंग : शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्‍यात देवदैठणे गावच्या शिवारात एक २१ वर्षांची तरुणी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपी ‘भागवत धोंडिबा वाघमारे, रा. देवदेठण याने तरुणीला धरून तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने जबरी संभोग केला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सदर तरुणी शेतातील विहिरीजवळ गुरे चारीत असताना आरोपी भागवत वाघमारे याने तरुणीला धरुन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला व कोणास काही सांगितले तर तुझ्या घरच्यासह तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

पिडीत तरुणीने काल जामखेड पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी भागवत वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीवायएसपी जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24