पुणे ;- विवाहपूर्व प्रेमसंबंध पतीला सांगण्याची धमकी देत प्रथम महिलेला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत संबंधीत महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नवील अब्दुल रेहमान (२२, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपीचे ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, फिर्यादीचे तिच्या घरच्यांनी लग्न केले होते.
लग्नानंतर आरोपीने तिला तुझ्या नवऱ्याला आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगतो, अशी धमकी देऊन घटस्फोट घेण्यास भाग पाडले.
यानंतर तिला आपण लग्न करू, असा खोटा विश्वास संपादन करून तिच्यावर वेळोवेळी लोणावळा, हैदराबाद आणि अहमदनगरमध्ये अत्याचार केला.
तसेच तिचे ५ तोळे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये काढून घेतले. यानंतर तिचा मानसिक, शारीरिक छळ केला.