अहमदनगर Live24 ,13 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील पाझर तलावाजवळ देवस्थान समितीच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी ६ वाजता भगवे कपडे घातलेल्या साधूचा मृतदेह आढळला.
मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातून घरी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना ब्रह्मानंद शिवगिरी (राहणार बुलडाणा) यांचा मृतदेह कानिफनाथ देवस्थान समितीने खोदलेल्या विहिरीत तरंगताना दिसला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. साधूच्या खिशात रोख रक्कम सापडली. देवस्थान समितीचे कर्मचारी, पोलिस अप्पासाहेब वैद्य, एकनाथ बुधवंत व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
साधूविषयी माहिती असल्यास पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन संतोष नवगिरे व अप्पासाहेब वैद्य यांनी केले आहे. कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ तलावाजवळील मंदिरात या साधूचे यात्रेपासून वास्तव्य होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews