अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे वाळू तस्करी करणारी टाटा पिकअप २०७ कॅनॉलच्या खड्डयांमध्ये उलटल्याने तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून रात्रीच्या वेळी( एमएच १४ ए एच १०७३ ) टाटा २०७ या पीकअप मध्ये वाळू भरून निघाली होती.
निमगाव मार्गे जात असतांना हिवरगांवपावसा खंडोबा मंदीरा जवळ कॅनॉलच्या लाईनमध्ये उलटून अपघात झाला. या अपघातात गाडी चालक व दोन मजूर असा तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाला आहे.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिघांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले तर एक जणाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews