अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली.
हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात !
किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोमटे याने राजाराम नामदेव वाघमारे (वय ५०, रा. भिंगार) यांचा खून केला होता.
हे पण वाचा :- विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !
यावेळी सुरक्षारक्षक अनिल उमाप यांच्यावरही लोमटे याने कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते. या घटनेनंतर उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोमटे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …
हत्यारा किरण लोमटे हा पसार असून त्याचा एमआयडीसी पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सुपरवाझर वाघमारे यांनी लोमटे याला रखवालीचे काम वाटून दिले होते. या कामावरून लोमटे हा कुचराई करत होता.
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. शुक्रवारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे यांच्या पथकाने आरोपीस अटक केली.