अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवारी अटक केली आहे. मंगळवार,दि. १७ डिसेंबर २०१९ रोजी दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शहादेव दहिफळे याच्यासह अकरा जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव दहिफळे हा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होता. बुधवारी उपचार पूर्ण झाल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी शहादेवला अटक केली.
रुग्णालयात शहादेव दहिफळे उपचार घेत असताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून मयत संजय बाबासाहेब दहिफळेंसह अकरा जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. हत्येच्या गुन्ह्यात शहादेव बाबासाहेब दहिफळे, विष्णू बाबासाहेब दहिफळे , ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, राहुल शहादेव दहिफळे व व्दारका भागवत नागरगोजे हे संशयित पाच आरोपी सध्या अटकेत असून, त्यांना गुरवारी न्यालयात हजर करण्यात येणार आहे.