अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील अपहरण झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळला आहे.
बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ बेलापूर बंद ठेवण्यात आले होते. अपहरणाचा तपास लागत नसल्याने लोकांंमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता.
व्यावसायिक हिरण पाच दिवसांपासून बेपत्ता होते पोलीसांना अद्याप त्यांचा तपास लागला नसल्याने अचुक माहिती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी बेलापूर गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता
मात्र आज सकाळीच व्यावसायिक गौतम हिरण यांचा मृतदेह आढळून आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एक प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत.त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते.त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
हिरण यांची मोटरसायकल श्रीरामपूर-बेलापूर बायपासला उभी आहे. गाडीला चावी व कागतपत्रांची पिशवीही तशीच आहे. हिरण यांची बेलापुरात एका नामांकित कंपनीची एजन्सी आहे.
सोमवारी सायंकाळी गोदामातून बाहेर पडलेले हिरण घरी निघाले होते. मात्र त्याचवेळी एका व्यक्तीने कारचा बिघाड झाला असून हिरण यांच्याकडे मदतीची मागणी केली.
या अज्ञात व्यक्तीने जॅकेट घातले असल्याचे काही लोकांनी सांगितले. हिरण यांनी एका मेकॅनिककडून कार दुरुस्तीसाठी साहित्य घेतले होते. ते कार दुरुस्ती करिता निघाले असता व्हॅनमध्ये त्यांना बसवले असे काही लोकांनी पाहिले.
व्हॅनमध्ये बसलेली एक व्यक्ती सोडा सोडा म्हणत दरवाजाला लाथा मारत होती असे श्रीरामपूर-बेलापूर बायपासवरील काही लोकांनी पाहिली. ते वाहन श्रीरामपूरच्या दिशेने गेले. त्यामुळे ती व्यक्ती हिरण होती का? तसेच त्यांचे अपहरण झाले का? अशी चर्चा आहे.