अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा या आमदार निलेश लंके यांच्या गावातील तरुणाचा शुल्लक भांडणाच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,हंगा गावातील तरुण सचिन बाळासाहेब शिंदे, वय ३२ याला गावातीलच आरोपी संतोष केशव दळवी, कृष्णा अशोक शिंदे या दोघांनी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास संगनमत करून हंगा गावातील सागर नगरे याच्या हॉटेलवर बोलावले होते.
तेथून त्याला हंगा गावच्या शिवारात मोराई नावाच्या शेतात भांडण झाल्याने लाथाबुक्क्याने मारहाण करुन कानाजवळ डोक्यात मारुन जिवे ठार मारले.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .
या प्रकरणी मयत सचिन शिंदे या तरुणाच्या आईने अलका बाळासाहेब शिंदे , धंदा शेती , रा इंदिरा कॉलनी , हंगा , ता . पारनेर सुपा पोलिसांत वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन आरोपी संतोष केशव दळवी , कृष्णा अशोक शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.