अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा ;- तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे राहणारा तरुण आकाश सुदाम खरपुडे , वय २८ याने पत्नीच्या अनैतिक संबंध व आरोपीच्या त्रासातून रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

या खळबळजनक घटनेप्रकरणी मयताचे भाऊ अमोल सुदाम खरपुडे यांनी काल सोनई पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी पूजा आकाश खरपडे , रा . शिंगवे तुकाई , प्रविण लोंढे , रा. घोडेगाव , ता. नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

असून फिर्यादीत म्हटले असून आरोपी पूजा खरपुडे हिचे आरोपी प्रविण लोंढे याच्याशी अनैतिक संबंध असल्याने मयत आकाश खरपुडे याला मानसिक तणावातून त्रास होता.

हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व 

आरोपी प्रविण लोंढे याने तुझी बायको पूजा आता माझी झाली आहे. तू तिला विसरुन जा व मुलगी आराध्या हिला व पूजा यांचे बदली तुला १ लाख रुपये देतो , असे म्हणून तुला अ‍ॅट्रोसिटीच्या कायद्यात अडकवू अशी धमकी दिली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

त्यातून भाऊ आकाश याने १ जानेवारी ते २ जानेवारी दरम्यान रहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली . मुलगी आराध्या हिच्या फोटोच्या मागे लाल रंगाने लिहून ठेवले की, पूजा व प्रविण यांना कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे लिहून ठेवले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24