अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- माजी महापौर संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांच्या अहमदनगर शहारातील केडगाव मधील बंगल्यात काल रात्री चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव मधील एकनाथ नगर परिसरात बुधवारी रात्री ही चोरी झाली आहे, याप्रकरणी सुरेखा भानुदास कोतकर यांनी फिर्याद दिली. कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,बुधवारी रात्री कोतकर कुटूंब एकत्र झोपले होते.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुप्रिया कोतकर यांनी सुरेखा कोतकर यांना फोन आला, त्यांनी सांगितले की आपल्या घरात आवाज येत आहे, तुम्ही बाहेर येऊ नका, असे सांगितले.
त्यानंतर घरच्या मागे पाळण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही सर्वांनी घराची पाहणी केली.त्यावेळी बंगल्यातील बेडरूम मध्ये असलेल्या कपटाचे लॉक तुटलेला आढळुन आले.
त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved