अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात होणार राजकीय भूकंप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : शिवसेना नगरसेवक व काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश करणार असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

या वृत्तास आमदार नीलेश लंके यांच्या विश्वासू सहकाऱ्यानी दुजोर दिला आहे. जर काही कारणनामुळे   वर्धापनदिनी प्रवेश झाले नाही, तरी महिनाभरात  पारनेकरांना हि धक्कादायक बातमी ऐकण्यास जरूर  मिळेल, असेही या सहकाऱ्याने सांगितले.

या मुळे मात्र पारनेर शहराती चांगलीच खळबळ उडाली आहे. या संभाव्य प्रवेशासंदर्भात आमदार लंके यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची भेट घेतल्याचीही माहितीही समोर आली आहे.

प्रमुखच अंधारात !
एकीकडे उपनगराध्यक्ष कुलट यांच्यासह प्रमुखांच्या प्रवेशाच्या जोरदार चर्चा असताना
चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर या प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यांच्याशी कोणी
संपर्कही केला नाही. त्यामुळे याबाबत प्रमुखच अंधारात आहेत.

औटी यांनी घेतली बैठक
माजी आमदार विजय औटी, भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांची मंगळवारी
औटी यांची  बैठक झाली.तर शंकर नगरे व वसंत चेडे यांनी एकत्र नगर दौरा केला. सेनेचे
नगरसेवक पक्षात घेऊन नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर
चेडे व नगरे यांच्या या दौऱ्यास महत्त्व आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24