अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक अपहार प्रकरणी ‘त्या’ चौघांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, इतर संचालक मंडळ सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ,

कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन संगनमत करुन खोटे कागदपत्रे तयार करुन बँकेच्या ३ कोटी रुपयांचा अपहार करुन ठेवीदार सभासद यांचा विश्वासघात केल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून याप्रकरणी चौघा जणांना  अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपींना मदत करणारे व गुन्ह्यात निष्पन्न झालेले आरोपी नगर अर्बन बँकेचे मुख्य शाखेचे शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ,

हेड कॅशिअर राजेंद्र विलास हंडेकरी, मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, कनिष्ठ अधिकारी स्वप्नील पोपटलाल बोरा यांना तपासकामी अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास व अटकेची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी व आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24