अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर ) शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी मोटारीचा भीषण आपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत.

या आपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मृतांमध्ये तीनही नगरचे रहिवासी आहे.

अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत (वय १४, रा. सिव्हिल हडको) व तारा शंकर भगत (रा. नगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

अपघातात रत्ना अर्जुन फुलसुंदर यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. अक्कलकोट येथून मालेगावकडे जाणारी बस ही अंबिलवाडी शिवारामध्ये आली असता समोरून येणाऱ्या त्या चाकी मोटारीवर जोरात धडकली.

यामध्ये मोटार गाडीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोटारीतील जखमीना जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी आणले.

या अपघातानंतर नगर-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24