अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचे दुखःद निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप पाटील (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले.

पाटील यांची तालुक्यात ओळख आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होती, जवळा जिल्हापरिषद गटात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात.

पक्षाच्या विवध पदांवर काम करत असतानाच पाटील यांनी जवळा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी, ‘जामखेड तालुका खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष,

तसेच जिल्हा परिषद प्राथामिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी काम केले. या माध्यमातून त्यांनी लोकोपयोगी कामे करण्याचा करण्याचा प्रयत्न कला,

पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील यांचे प्रदीप पाटील हे थोरले बंधू होते. त्यांच्यामागे आई , वडील , एक भाऊ दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे त्यांच्या अकाली निधनाने जवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24