अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात.
राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२
(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)
जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८०
एकूण स्त्राव तपासणी २९९४ = निगेटीव २६८४ रिजेक्टेड २६ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी ५६
जिल्ह्यातील बारा रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
त्यात नगर शहर 5 संगमनेर 2 राशीन( कर्जत) दोन आणि नेवासा राहाता, अकोले प्रत्येकी एक यांचा समावेश आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या आता 121 झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews