अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- रविवारची सुरुवातच अपघाताच्या सत्राने सुरु झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जीप व एक खासगी ट्रक यांच्या भीषण अपघात झाला.
दरम्यान हा भीषण अपघात नाग दौंड रोडवरील घारगाव शिवारात निलगिरी हॉटेलजवळ घडला आहे, अशी माहिती मिळते आहे. या अपघातात अहमदनगर येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यामध्ये माथाडी महामंडळातील निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढेकर (वय ५७ रा. अहमदनगर) व त्यांचा चालक अशोक पुंजाबा औटी (वय ४८ रा. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, प्रभाकर निवृत्ती लोंढेकर हे राशीनवरून श्रीगोंदामार्गे नगरकडे जीपमधून चालले होते. ट्रकने समोरून येऊन बोलेरोला जोराची धडक दिली.
यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी गॅस कटरचा वापर करीत मृतदेह बाहेर काढले. गाडीचा चक्काचूर झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved