अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

श्रीरामपूर तालुक्यातील एक गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात करोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला.

त्याला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरु असतानाच मृत्यू झाला. त्याला रक्तदाबाचा आजार होता.

रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला प्रथम अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी पाठविलेला त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जास्त त्रास होत असल्याने त्याला चार दिवसांपुर्वी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तेथे दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24