अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गाजदीपूर गावात अल्पवयीन मुलीवर मेंढ्या चारत असताना एका 56 वर्षीय व्यक्तिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर पोलिसांनी अनिल खंडु गुंजाळ (रा.दैठणे गुंजाळ ता.पारनेर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि ऑक्टोबर 2019 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत या परिसरात वास्तव्यास असताना आरोपी अनिल खंडू गुंजाळ याने पीडित मुलीस एकांतात पाहून शेतात ओढून बलात्कार केला.
त्यातून पीडित मुलीस दिवस गेले. याबाबत अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथून अहवाल प्राप्त झाल्यावर फिर्यादी मुलगी ही हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण म्हणून औषध उपचार घेत असताना तिने पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने, पोह भिंगारदिवे यांच्यासमक्ष दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com