अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहराचा पारा घसरला असून, शुक्रवारी नगर शहरात किमान ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान शुक्रवारी होते. गारठ्यामुळे नगर शहरातील व्यवहार संध्याकाळी थंडावले होते. कापडबाजारात शुकशुकाट होता. जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नगरमध्ये ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. चांगल्या पावसामुळे यंदा थंडी वाढली आहे.