अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले तब्बल ३३७ रुग्ण, जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील परिस्थिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यात आज २७१ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ७१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२१ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ३३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८२० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८२ आणि अँटीजेन चाचणीत २४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५२, अकोले ०४,  जामखेड ०३, कर्जत  ०२, कोपरगाव १८, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०४, राहाता १८, राहुरी ०३, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४३, अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०९,  पारनेर ०३,  पाथर्डी ०२, राहाता ३१, राहुरी ०६, संगमनेर ३९, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०५,  श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०८, जामखेड ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता ०४, राहुरी ०१, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ८७, अकोले ०९, कर्जत ०२, कोपरगाव १०, नगर ग्रामीण २१, नेवासा ०९, पारनेर १२, पाथर्डी ३१,  राहाता १५, राहुरी ०३, संगमनेर २८, शेवगाव १६, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१, आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७५७१३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १८२०
  • मृत्यू:११६३
  • एकूण रूग्ण संख्या:७८६९६
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24