अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्ण वाढीचा आलेख चढताच; जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतच असून रुग्ण संख्या कांही केल्या कमी होत नाहीय आजही जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढलेले तालुकानिहाय कोरोना रुग्ण पुढेलप्रमाणे आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1319 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. नगर शहरात चोवीस तासात 362 बाधितांची भर पडली आहे. 

अहमदनगर शहर 362, राहाता 63, संगमनेर 64, श्रीरामपूर 91, नेवासे 100, नगर तालुका 58, पाथर्डी 65, अकोले 63, कोपरगाव 144, कर्जत 50, पारनेर 28, राहुरी 51, भिंगार 39, शेवगाव 53, जामखेड 32, श्रीगोंदे 34, 

मिलीटरी हॉस्पिटल 2, आणि इतर जिल्ह्यातील 20 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 447, खाजगी प्रयोगशाळेनुसार 400 आणि रॅपिड चाचणीमध्ये 472 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24