अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा महाविस्फोट ! चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत भयंकर बनत चालली असून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 

गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 2405 रुग्ण वाढले आहेत, कालही तब्बल 2,654 रुग्ण वाढले होते. 

आजही अडीच हाजाराजवळ काेराेना संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 405 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.

नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयानुसार 556, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 517 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1332 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

रुग्णालये आता हाऊसफुल्ल :- नगर शहरातील सर्वच रुग्णालये आता हाऊसफुल्ल आहेत. एकाही खासगी अथवा जिल्हा सरकारी रुग्णालयात देखील साधा किंवा ऑक्सिजन बेड शिल्लक नाही.

शहरात काही ठिकाणी कोविड रिकव्हरी सेंटर उघडण्यात आले आहेत. मात्र, तेथे जाण्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकही फारसे इच्छूक दिसत नसल्याचे चित्र आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24