अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली.

यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये धुळे जिल्हा -०१, मनपा ०५, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर १४ असे रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा आणखी २२ रुग्ण बाधीत आढळून आले. यामध्ये मनपा ०६- शहर ०५, सारसनगर ०१, पारनेर ०३- पारनेर शहर ०१, रांजणगाव मशीद ०१, किन्ही ०१, अकोले ११ – शेटेमळा 5, लाडगाव ०१, सुगाव खुर्द ०१, उंचखडक ०२, बांगरवाडा (राजूर) ०२, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०१- चांदा,

दरम्यान, आज एकूण ३४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर १४, राहाता १७, पाथर्डी २७, नगर ग्रा.१०, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ८, नेवासा १०, श्रीगोंदा ९,पारनेर ७, अकोले १, राहुरी ४, शेवगाव ६ कोपरगाव १, जामखेड ४, कर्जत ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ४३६५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२३५९
  • मृत्यू: ८४
  • एकूण रूग्ण संख्या: ६८०८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24