अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल 681 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 672 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.67 टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (सोमवार)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 136 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4123 इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28, संगमनेर 10, पाथर्डी 05, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर 01, नेवासा 25, राहुरी 01, शेवगाव 49, कोपरगाव 05 आणि कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 681 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 133, संगमनेर 61, राहाता 52,पाथर्डी 26,नगर ग्रा 40, श्रीरामपूर 29, 

कॅन्टोन्मेंट 22, नेवासा 68, श्रीगोंदा 19, पारनेर 40, अकोले 31, राहुरी 26, शेवगाव 34, कोपरगाव 20, जामखेड 33, कर्जत 28, मिलिटरी हॉस्पिटल 17 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: 27672
  • उपचार सुरू असलेले रूग्ण :4123
  • मृत्यू : 504
  • एकूण रूग्ण संख्या : 32299

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24