अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला आहे. जिल्ह्यात सातत्याने तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.व रुग्ण संख्या सर्वासाठीच चिंताजनक बनली आहे.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ३५९२ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.धक्कादायक म्हणजे नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ८४९ रुग्ण आढळले आहेत.
सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे –
दरम्यान वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुचनेनूसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी रात्री जिल्ह्यातील किरणा दुकान, भाजीपाला विक्री, मटन, अंडी, चिकन, दुग्धजन्य पदार्थ विक्री आणि पेट्रोल पंप हे सकाळी सात ते 11 याच दरम्यान सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
हे आदेश (दि.18) मध्य रात्रीपासून 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, सकाळी 11 नंतर पेट्रोल पंपावरील सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी डिझेल विक्री सुरू राहणार आहे.