अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही कडक निर्बंध झाले आहेत. नगरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.
आज विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी याच गतीने सुरू राहिल्यास नगरमध्ये ही कडक निर्बंध लागू शकतात.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 1996 रुग्ण आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक 476 आणि कोपरगाव तालुक्यात 202 रुग्ण आढळले.
त्या खालाेखाल राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यात रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेली आहे. अहमदनगर शहर 476, राहाता 195, संगमनेर 154, श्रीरामपूर 193, नेवासे 57, नगर तालुका 93, पाथर्डी 140,
अकाेले 28, काेपरगाव 202, कर्जत 25, पारनेर 65, राहुरी 79, भिंगार शहर 31, शेवगाव 69, जामखेड 94, श्रीगाेंदे 69, इतर जिल्ह्यातील 19, इतर जिल्ह्यातील 02 आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 05 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 823, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 902 आणि रॅपिड चाचणीमध्ये 271 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.