अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स एकाच क्लिकवर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये 829 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 239 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे. शहरात काेराेना संसर्गाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. 

मागील चोवीस तासात 829 नवीन बाधिताची रूग्णसंख्येत भर पडली आहे. 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

नगर शहरातही रूग्णवाढीचा आलेख कायम आहे. आज मनपा हद्दीत नवीन 239 रूग्णांची भर पडली आहे. त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रूग्ण आढळून आले आहेत.

नगर ग्रामीणमध्येही रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून चोवीस तासात 74 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे :-  नगर मनपा – 239, कोपरगाव -89, राहाता-81, नगर ग्रामीण-74, श्रीरामपूर-55, नेवासा-52, पारनेर-48, संगमनेर-97, कर्जत-32, राहुरी-30, पाथर्डी-29, अकोले-27, बाहेर जिल्ह्यातील रूग्ण-11, श्रीगोंदा-10, कॅन्टान्मेंट बोर्ड-9, जामखेड-4, शेवगाव-2.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24