अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८२८ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०२, राहुरी ०१, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८७७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५७, संगमनेर ३९, राहाता ६७, पाथर्डी ३९,नगर ग्रा. ५५, श्रीरामपूर ३०,

कॅन्टोन्मेंट १०, नेवासा ५६, श्रीगोंदा ३१, पारनेर ३०, अकोले ५०, राहुरी ६८, शेवगाव ०३, कोपरगाव ४८, जामखेड ४१,
कर्जत ३३a आणि मिलिटरी हॉस्पिटल २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३२४४८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३८२८
  • मृत्यू:६०१
  • एकूण रूग्ण संख्या:३६८७७

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24