अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज २०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ५३ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६० ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत १६९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०२ आणि इतर जिल्हा ०१ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२,पाथर्डी ०२,

राहाता ०५, राहुरी ०२, संगमनेर १२, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १६९ जण बाधित आढळुन आले.

यामध्ये मनपा ०९, अकोले १०, जामखेड ०१, कर्जत ०५, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, नेवासा १२, पारनेर २४, पाथर्डी १०, राहाता ०८, राहुरी ०५, संगमनेर ५७, शेवगाव ०३,

श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १४, जामखेड ०८, कर्जत २६,

कोपरगाव ०७, नगर ग्रा.०२, नेवासा ०९, पारनेर ०२, पाथर्डी १९, राहाता १८, राहुरी ०३, संगमनेर ३२, शेवगाव ३०, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५४०५३

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४२८

मृत्यू:८६१

एकूण रूग्ण संख्या:५६३४२

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24