अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर व आता शेवगाव तालुक्यात जावयांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे.
अगोदरच रुग्णांची वाढती संख्या सर्वाची डोकेदुखी ठरत असतानाच जावयांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने जावयांच्या आगमनामुळे अहमदनगर जिल्हा हैराण झाला आहे.
शेवगाव तालुक्यातील अधोडी येथील भाचेजावई असलेला ४५ यर्षीय व्यक्ती (मुळगाव मालेगाव,ता.गेवराई, जि. बीड) ठाणे जिल्ह्यातील कळव्याहून ई-पासमध्ये आधोडीचा पत्ता देऊन कुटुंबासह गावी येत होता.
मात्र रस्त्यानेच त्रास जाणवू लागल्याने तो गावी न येता स्वत: हून जिल्हा रूग्णालयात दाखल झाला.या व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घुले यांनी सांगितले.
संबंधित कोरोनाबाधिताच्या संपर्कातील इतरजन वेगवेगळ्या गावात विखुरलेल्या असल्याने प्रशासनासह तीन गावांची डोकेदुखी वाढली आहे. शेकरे व आधोडी या दोन सासुरवाडी असलेल्या गावातील पाहुणेही हैराण झाले आहेत.
आधोडी येथील १ व शेकटे येथील २ जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. तसेच यांच्या संपर्कात आलेल्या
आधोडीतील १० शेकटेतील ९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तसेच या रुग्णाच्या सोबत आलेले कुटुंबातील ४ जण बीड जिल्ह्यात गेले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews