अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या रविवार अखेर २१ झाली. काल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ३८ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ३८ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात दोघांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यात नगर शहरातील मुकुंदनगर येथील एक जण, तर राहाता तालुक्यातील लोणी येथील एकाचा समावेश आहे.
मुकुंदनगरमधील व्यक्ती ३५ वर्षीय तर लोणी येथील व्यक्ती ४६ वर्षीय आहे. हे सर्व विदेशी नागरिकांच्या संपर्कात आल्याने यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान कोरोना बाधीतांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.
तर अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्याने दोघांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या आयसोलेशन कक्षात १९ कोरोना बाधीत निगराणीत आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनसह प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी करण्यात आल्या आहेत.
बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती निगराणीखाली आहेत. सूचनांचे पालन करीत प्रत्येकाने कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, श्वसनाचा त्रास, आजार असलेल्या व्यक्तींनी आरोग्य यंत्रणेशी संबंधित संपर्क करावा, तपासणी करून घ्यावी, परिस्थितीचे गांभीर्य समजून घराबाहेर पडूच नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com