अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे.
त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.
खा.सुजय विखे यावेळी म्हणाले ‘नगर शहरासह जिल्ह्यात सुरुवातीला दहा रुग्ण होते. ते आता हजाराच्यावर गेले आहेत. कोरोनाचा इतक्या झपाट्याने प्रसार होत आहे की परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होऊ शकते.
त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा.’ प्रशासनाने निर्णय न घेतल्यास जो काही अनर्थ होईल त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील असेही ते म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews