अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार पुन्हा वाढले ‘इतके’रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात  कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा ३२५ रुग्ण वाढले आहेत, यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या १७४० झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. शुक्रवार पासून दररोज तीनशेहुंन अधिक रुग्ण वाढत असल्याने चिंताजनक परीस्थिती निर्माण झाली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात आज २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७४० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७३ आणि अँटीजेन चाचणीत ०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत  ०१, कोपरगाव ०३,  नगर ग्रामीण ०८, नेवासा ०४, पारनेर ०२, राहाता ०३, राहुरी ०६, संगमनेर ४६, शेवगाव ३१, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५४, अकोले ०५ ,कर्जत ०१,  कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १२, नेवासा ०८,  पारनेर ११, पाथर्डी ०४, राहाता १८, राहुरी १०, संगमनेर २४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२,  श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०३ जण बाधित आढळुन आले. पाथर्डी ०१ आणि राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ७४, अकोले ०९, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०६, पाथर्डी ०२, राहाता १८, राहुरी ०२, संगमनेर ४१,शेवगाव १२,  श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ०७, आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७५२२७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १७४०
  • मृत्यू:११५७
  • एकूण रूग्ण संख्या:७८१२४

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24