अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- प्रशासनाने आज महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांना महापालिकेचे बजेट सादर केले . 2020-21 साठी जवळपास 715 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.
यात 294 कोटीचे महसुली उत्पन्न आणि 380 कोटी भांडवली जमा, दुबेरजीचे 37 कोटीसह सव्वातीन कोटी शिलकीचे हे बजेट आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांना सादर केले.
काय सांगते आकडेवारी :- अंदाजपत्रकात 294 कोटी महसुली उत्पन्न तर 380 कोटी भांडवली जमा दाखविण्यात आले आहेत. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी 34 कोटी,
शास्तीपोटी 55 कोटी, संकलीत करावर अधारीत करापोटी 14 कोषटी, जीएसटी अनुदान 95 कोटी 74 लाख, इतर महसुली अनुदान 3 कोटी,
गाळेभाडे पोटी 3 कोटी, पाणीपट्टी 18 कोटषी, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी 42 कोटी, संर्कीर्णे 98 लाख या महत्त्वाच्या बाबीचा समावेश आहे. महसूली खर्च 241 कोटी 76 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे.
380 कोटषी रुपये भांडवली जमा दाखविण्यात आले असून भांडवली खर्च 433 कोटी 27 लाख इतका अपेक्षित धरण्यात आला आहे.
दुबेरजीचे 37 कोटी 99 लाख रूपये जमा तर 37 कोटी 44 लाख रुपये अपेक्षित खर्च दाखविण्यात आला आहे. 3 कोटी 53 लाख रुपये सुरूवातीच्या शिलकेसह 715 कोटी 71 लाख रुपये जमा होणार असून खर्च 712 कोटी 48 इतका अपेक्षित धरण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved