अहमदनगर महापालिका सत्ता पॅटर्न आता राज्यात ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : अहमदनगरच्या महानगरपालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे.नगरचा हा सत्ता पॅटर्न आता राज्यात राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात हाच पॅटर्न राबवित सत्ता स्थापन केली आहे.

सन २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात नगरच्य मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २४,राष्ट्रवादी काँग्रेस १८ व १ अपक्ष मिळून १९,भाजप १४,काँग्रेस ५,बसपा ४,सपा १,असे नगरसेवक निवडून आले.

संख्याबळाच्या दृष्टीने भाजप तिसऱ्या स्थानी असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापालिकेत सत्ता स्थापन केली.

शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीने शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले. हाच पॅटर्न आता भाजपने राज्यात राबविला आहे.
दरम्यानच्या काळात महापालिकेत भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीने पक्षाच्या नगरसेवकांवर कारवाई केली होती.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात आली होती.राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नगरच्या महापालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर विराजमान झाला आहे.
महापालिकेतील या सत्तेचा एक वर्षाचा कालावधी डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होत आहे. आता हाच नगरचा सत्तेचा पॅटर्न राज्यात अस्तित्वात आला आहे.याची नगरकरांमध्ये जोरदार खमंग चर्चा सुरू झाली आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24