Ahmednagar News : अहमदनगरमधील वडगाव दर्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी, झुलत्या पुलासह अनेक सुविधांची निर्मिती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगरमधील वडगाव दर्या हे निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसरातील जमीनीचा मालकी हक्क वनविभागाकडे असल्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने दुर्लक्षित राहिला.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे हे प्रयत्नशील होते. आता खा. डॉ.सुजय विखे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून या भागाच्या विकासासाठी ९ कोटी १७ लाख ४८ हजार रुपये निधीस तत्वतः मंजुरी मिळाली आहे.

दर्याबाई व वेल्हाबाई देवास्थानांवरील महाराष्ट्रातील नागरिकांची असलेली श्रद्धा, पर्यटकांना आकर्षित करणारा येथील निसर्गरम्य परिसर, पठार भागात पाण्याचे सातत्याने असणारे दुर्भिक्ष्य, निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध अडचणीना तोंड देणारा

मोठ्या प्रमाणातील शेतकरीवर्ग व उपजीविकेसाठी शहराकडे धाव घेणारा तरुणवर्ग या सगळ्या गोष्टींचा विचार करत वडगाव दर्या येथील सबंधित विकासकाम मार्गी लागल्यास पर्यटकांच्या गरजा भागविण्यासाठी छोटे मोठे उद्योग वाढीस लागतील.

विविध वन औषधींच्या निर्मितीस मिळणार असलेली चालना यामुळे रोजगार निर्मिती शक्य होईल. कोरडे यांनी गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत विविध अधिकारी व पदाधिकाऱ्या सोबत तिन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केले. विविध अभियंत्यांशी चर्चा करत या भागाच्या विकासाची धोरणात्मक मांडणी करत सुमारे तिन वर्षात मार्गी लागणाऱ्या या योजनेची नियोजनात्मक मांडणी केली होती.

मंदिर परिसरातील दोन दरी जोडणारा झुलता पूल हे या योजनेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. पर्यटकांसाठी सर्व सुख सुविधासह सुसज्ज असणारी अतिथिगृह, स्नानगृह, स्वयंपाकगृह व प्रसाधनगृहांसह, माकडांच्या संवर्धन व संरक्षणासाठी स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

या भागातील नैसर्गिक चमत्कारांचा स्थानिक नागरिकांच्या उत्कर्षासाठी धोरणात्मक उपयोग करून घेण्याचा आपला मनोदय असून पुढील काळात याच परिसरात निसर्गोपचार केंद्र, वन औषधींच्या निर्मितीला व उपयोगीतेला चालना देणारे नवनवीन प्रयोग राबवले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office