अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबद्दल अनेकांनी डोके लावूनही फत्ते झालेले नाही. परंतु येथील गटारीचे काम तरी लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा घेऊन नागरिकांनी खा.डॉ.विखे यांना गार्हाणे मांडले.
परंतु खासदारांच्या समोर फक्त हो म्हणून ठेकेदाराने हे काम ‘जैसे थे’च ठेवले. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. विखे कुटुंबाची कामाची पध्दत जिल्ह्याला माहिती आहे.
त्यामुळे खासदार डॉ.सुजय विखे यांनी हे काम हाती घेतले म्हणजे काम फत्ते होणार असे नागरिकांना वाटत होते. त्यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते.
मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे खासदारांनी सांगूनही काम अधुरेच राहिल्याने आता दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.
बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबाबत खासदार डॉ़. सुजय विखे यांनी महापालिकेत बैठक घेतली़. हे काम सुरू का होत नाही? काय अडचणी आहेत? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराला चांगलेच सुनावले.
ठेकेदाराला तर काम पूर्ण केले नाही तर तुमच्या घरी येऊन बसेन, अशी धमकी दिली. ठेकेदारानेही मान डोलावत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही आदेश काढला.
कामाची पाहणी केली़. पण वर्षे उलटूनही गटारीचे काम ठेकेदारे पूर्ण केलीच नाही. गुरुवारी सायंकाळी नगर शहरात अवकाळी पाऊस झाला. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी आले. या मार्गावरील दुकानांमध्ये पाणी घुसले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com