अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील कविता गौतम जाधव ही विवाहित महिला तिच्या २ मुलांसह शुक्रवारपासून बेपत्ता आहे.
कविता (वय ३१) ही साहिल (वय १४) व निखील (वय १२) यांच्यासह घरी काही न सांगता शुक्रवारी निघून गेली.
तिचा पती गौतम चंदर जाधव याने नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक व्ही. आर. खंडीझोड करत आहेत.
या तिघासंदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.