कोणाचेही बिल अदा करू नये – आमदार बबनराव पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाच वर्षांनी प्रथमच १३२ लिंक कालव्याला वेळेत पाणी सुरू आहे.

घोडखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आवर्तन १८ जानेवारीला सुटत असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी दिली.

हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ ! 

पाचपुते म्हणाले, घोडच्या आवर्तनाच्या तारखेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बदल केला आहे. कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना भेटून आवर्तन १८ ला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. विसापूरमधून १६ ला आवर्तन सुटेल. १३२ मधून सध्या पाणी सुरू आहे.

हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

सर्वांचे भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. लाभक्षेत्रातील गावतलाव, पाझर तलावात जेथे गरज असेल तेथे पाणी सोडले जाईल. घोड-कुकडीच्या नियोजना अभावीमागे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नागपूर अधिवेशनात सरकारकडे आपण मागणी केली,

ती घोड व कुकडीच्या पूर्ण हंगामाच्या नियोजनाची. तसे पत्र मुख्यमंत्र्यांना आपण पाठवले. त्यामुळे आगामी काळात योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. काही रस्त्यांची निविदा पूर्ण होऊनही काम सुरू झाले नाही. खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.

काष्टी-श्रीगोंदे रस्त्याची तर भयंकर अवस्था आहे. खड्डे व्यवस्थित बुजवल्याशिवाय कोणाचेही बिल अदा करू नये, अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांकडे केली असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24