पालकांनो सावधान ! तरुणाई चिनी ‘ई- सिगारेट’ च्या विळख्यात अडकतेय, नेमके काय आहे ‘ई- सिगारेट’? जाणून घ्या..

सध्या तरुणाई अनेक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसतेय. शालेय मुलेही या व्यसनाच्या विळख्यात अडकताहेत. पालकांनी आपल्या पाल्याची वेळीच दखल घेणे किंवा त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Pragati
Published:
e cigar

Ahmednagar News : सध्या तरुणाई अनेक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसतेय. शालेय मुलेही या व्यसनाच्या विळख्यात अडकताहेत. पालकांनी आपल्या पाल्याची वेळीच दखल घेणे किंवा त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

सध्या सुगंधी तंबाखू, दारू अशा व्यसनासोबतच आता तरुण चिनी ई-सिगारेटच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे ई-सिगारेटची ऑनलाइन डिलिव्हरी मिळत असल्याने ग्रामीण भागातही याचे पेव फुटले असल्याचे चित्र आहे.

ई-सिगारेटस् वापरणाऱ्यांना तीव्र न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास, कफ, ताप, थकवा अशी लक्षणे आढळून येतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. सिगारेटला पर्याय म्हणून ई- सिगारेटचा पर्याय पुढे आला.

मात्र, धूम्रपानाची समस्या सोडविण्यात ई- सिगारेट अयशस्वी ठरले आहे. शाळकरी मुलांमध्येही याचे फॅड वाढले आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. केंद्र सरकारने ई- सिगारेटचे उत्पादन,

आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही छुप्या मार्गाने त्याची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. ई-सिगारेट ऑनलाइन किंवा छुप्या मार्गाने काही शॉप्स, पानटपरीवर विकत मिळते.

याचे दर सातशे रुपयांपर्यंत ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत. लोक सर्वाधिक ऑनलाइन खरेदी करतात. विविध ब्रँडेड साइटवर ई-सिगारेट विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे ई-सिगारेट?
ई-सिगारेटमध्ये तंबाखुचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही. दातांवर डागही पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाईट असते. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते.

ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. सिगारेटचे व्यसन सोडविण्यासाठी ई- सिगारेटचा पर्याय दिला जातो. ई- सिगारेटच्या वापराने अमेरिकेसह अन्य देशांत मृत्यू झाले आहेत.

ई- सिगारेटमध्ये असलेल्या निकोटिनचा परिणाम आरोग्यावर होतो, असे व्यसन टाळणे पुढे कठीण होते असेही म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe