अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे खासदार सुजय विखे यांनी समर्थन केले. खातेवाटपावरून वाद कशासाठी, मलईदार खाते मिळवून मलई कमवायची असेल, तर त्यांनी मंत्री होण्याऐवजी ठेकेदारच व्हावे, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !
खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….
विखे यांनी बैठकीत भाजपने सत्ता काळात सर्व कामे उरकून घ्यावीत. केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या योजना सहा महिन्यांत पूर्ण झाल्या पाहिजेत. शहरातील रिकामे भूखंड व आरक्षित जागांवर मनपाचे नाव लावण्यात आली? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला बैठकीत विचारला.
हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू
अमृत योजनेच्या ठेकेदाराची मुदत संपली असून कारवाई करावी. ही योजना तातडीने पूर्ण करून लोकार्पणाची तारीख निश्चित करा, अशी सूचनाही त्यांनी दिली. राज्य सरकारच्या खातेवाटपासह विविध मुद्यांवरून, माजी खासदार गडाख यांनी वक्तव्य केले आहे.
हे पण वाचा :- अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …
राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नीट वागले नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही राजीनामा देतील, असे मत त्यांनी मांडले होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना खासदार विखे म्हणाले, गडाख हे मार्गदर्शक नेते आहेत. मीही त्यांना राजकीय गुरूच मानतो.
हे पण वाचा :- माजी महापौर संदिप कोतकर व सचिन कोतकर यांना जामीन मंजूर !
वैचारिक दृष्टिकोन असलेल्या त्यांच्यासारख्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. खातेवाटपावरून जर नाराजी होत असेल, तर खात्याच्या निर्णयाबाबत किती वाद होतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मलईच्या खात्यांसाठी आटापिटा करण्याऐवजी त्यासाठी ठेकेदार व्हावे, असा टोलाही विखे यांनी लगावला.
हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !
एखाद्या खात्याची ओळख काम करणाऱ्या व्यक्तीमुळे होणे आवश्यक आहे, जर क्षमता असेल खात्याचे कामही चांगल्या पद्धतीने करता येते. दरम्यान, राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. नेत्यांची मने जुळवून घेतली, परंतु, स्थानिक कार्यकर्त्यांची मने अद्याप जुळलेली नाहीत. नगरमधील परिस्थिती पाहिली तर शिवसेनेने एखादा प्रकल्प मंजूर करून आणली, तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला समर्थन देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे.