पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे.

देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत.

आज अहमदनगर शहरात पेट्रोल 87.19 रुपये प्रतिलिटर व डीझेल 77.62 रुपये प्रतिलिटर दर झाले आहेत.

दरम्यान देशात 7 जूनपासून इंधन दरवाढ सुरुच आहे.गेल्या 23 दिवसांत पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी तर डिझेलची किंमत 10.90 रुपयांनी वाढली आहे.

23 दिवसात केवळ कालच (28 जून) भाव स्थिर राहिले होते. तीन आठवडे सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक त्रासून गेले असून कोरोनासोबातच इंधन दरवाढीचाही समान सर्वसामान्यांना करावा लागत आहे.

PETROL PRICE IN AHMEDNAGAR FOR LAST 10 DAYS

29 June, 2020 ₹ 87.19 Per Litre ₹ 0.05
28 June, 2020 ₹ 87.14 Per Litre ₹ 0.00
27 June, 2020 ₹ 87.14 Per Litre ₹ 0.23
26 June, 2020 ₹ 86.91 Per Litre ₹ 0.20
25 June, 2020 ₹ 86.71 Per Litre ₹ 0.15
24 June, 2020 ₹ 86.56 Per Litre ₹ 0.00
23 June, 2020 ₹ 86.56 Per Litre ₹ 0.19
22 June, 2020 ₹ 86.37 Per Litre ₹ 0.31
21 June, 2020 ₹ 86.06 Per Litre ₹ 0.33
20 June, 2020 ₹ 85.73 Per Litre ₹ 0.48

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24